कर्जत : कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले राघो दामा मिरगुडा यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. २५ एप्रिलच्या रात्री हळदी समारंभातून घरी परतत असताना ही घटना घटली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये राघो दामा निरगुडा हे काम करायचे. ते कळंब ग्रामपंचायतीमधील भागूची वाडी येथे राहत होते. २५ एप्रिल रोजी निरगुडा हे चाहूची वाडी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे हळदी समारंभास आपल्या कुटुंबासमवेत गेले होते. मध्यरात्री १ वाजता राघो यांना त्यांच्या नातेवाइकाने मोटारसायकलवरून भागूची वाडीच्या फाट्यावर आणून सोडले. तेथून ते निरगुडा कच्च्या रस्त्याने भागूची वाडी येथील घरी जात होते. त्या वेळी राघो यांना अज्ञात इसमांनी दगडाने ठेचून मारले. त्यांच्या डोक्यात दगडाचा जोरदार मार लागल्याने ते रक्तबंबाळ होऊन तेथेच पडले. त्यांच्या डोक्यातून वाहिलेले रक्त २५ मीटरपर्यंत पोलिसांना आढळून आलेअसून चार दगडही पोलिसांना आढळले. त्यांचे मोठे भाऊ विठ्ठल दामू निरगुडा पहाटे ३ वाजता हळदी समारंभातून भागूची वाडी येथे येत असताना त्यांना राघो यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. २६ एप्रिल रोजी सकाळी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. मृत राघो दामा निरगुडा यांचे भाऊ गोविंद दामा निरगुडा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मागील दोन वर्षांतील दगडाने ठेचून मारल्याची ही दुसरी घटना आहे. याच भागातील मिरचुलवाडीतील आदिवासी तरुणाचा रात्रीच्या वेळी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. राघो दामा निरगुडा हे कळंब, नेरळ भागात रस्त्यावर काम करत असत. त्यांना दगडाने ठेचून मारण्यामागचा उद्देश काय, याबाबत कोणतीही माहिती नेरळ पोलिसांनी दिली नाही. |
Post Top Ad
27 April 2013
Home
Unlabelled
कर्जत येथे आदिवासीचा दगडाने ठेचून खून
कर्जत येथे आदिवासीचा दगडाने ठेचून खून
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment