मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये कामकाज योग्य प्रकारे चालवण्यासाठी एकूण १ लाख ४0 हजार कर्मचार्यांची आवश्यकता असताना सुमारे २८ हजार ६६१ पदे रिक्त असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी सातपुते यांनी दिली. मुंबई महानगर जनसंपर्क विभागाकडून आयोजित या विभागाला सादरीकरणात ही माहिती देण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेत अ, ब, क, ड या श्रेणीची मिळून सरळसेवा भरतीने भरावयाची १८ हजार ८४३ पदे रिक्त असून ९ हजार ८१८ पदोन्नतीची पदे रिक्त आहेत, तर सर्वात जास्त रिक्त पदे क आणि ड श्रेणीची असून क श्रेणीमध्ये ८ हजार ५८९, तर ड श्रेणीची ८ हजार ३४९ पदे रिक्त असल्याचे सातपुते यांनी सांगितले. यामध्ये क श्रेणीमध्ये १ हजार ३७२ पदे, तर ड श्रेणीतील ३ हजार ७५0 रिक्त पदे पदोन्नतीने भरावयाची आहेत. या रिक्त पदांमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील मागासवर्गीयांची ३ हजार १८८ पदे रिक्त असून यामध्ये ६६१ पदे पदोन्नतीने भरावयाची असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असलेल्या रिक्त पदांमुळे पालिकेच्या विविध विभागांत कामकाजावर परिणाम होत असतो आणि त्याची झळ जनतेला बसते. मात्र ही रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट करत सातपुते यांनी नवृत्त कर्मचार्यांमुळे पुन्हा बॅकलॉग निर्माण होत असल्याचे सांगितले.
Post Top Ad
19 April 2013
Home
Unlabelled
मुंबई महानगरपालिकेत २८ हजार पदे रिक्त
मुंबई महानगरपालिकेत २८ हजार पदे रिक्त
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment