पुनर्वसनाविना अनधिकृत बांधकामे पाडल्यास आंदोलन - आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 April 2013

पुनर्वसनाविना अनधिकृत बांधकामे पाडल्यास आंदोलन - आठवले

मुंबई / http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंब्रा-दिव्यासह ठाणे महापालिकेच्या हद्दीत उभ्या राहिलेल्या अनेक अनधिकृत इमारतींमध्ये नोकरदार मध्यमवर्गीय रहिवासी राहत आहेत. त्या रहिवाशांनी आयुष्याची कमाई या इमारतींमध्ये लावली असून त्यांचे पुनर्वसन न करताच अनधिकृत इमारतींवर कारवाई केली, तर रिपब्लिकन पक्षातर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचा अनधिकृत बांधकामांना पाठिंबा नाही. मात्र अनधिकृत बांधकाम होत असताना डोळे बंद करून बसलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करा, असेही आठवले यांनी म्हटले आहे. तसेच ज्या धोकादायक इमारती आहेत त्या पाडण्यापूर्वी त्यातील रहिवाशांचे त्वरित पुनर्वसन करावे. अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या बांधकामांवर दंड आकारून अधिकृत म्हणून घोषित करण्यात यावीत, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad