मुंबई : केंद्र सरकारी कर्मचार्यांना लागू करण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी मुंबई मनपाच्या कर्मचार्यांना लागू करण्यात याव्या, असा निर्णय औद्योगिक न्यायालयाने नुकताच दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २00५ आणि काही बाबतीत २00८ पासून कोणतीही वसुली न करता करावयाची आहे. या ऐतिहासिक आदेशामुळे तत्कालीन आयुक्त सुबोधकुमार यांच्या गेल्या वर्षीचा वेतनकरार प्रभावहीन ठरल्याचा दावा कामगार नेते शरद राव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला आहे. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार निकालाच्या दिवसापासून ६0 दिवसांत सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केंद्र सरकारप्रमाणे पालिका कर्मचार्यांना देण्यात यावी आणि २ मार्च २00९, ११ जुलै २0१0 आणि ९ ऑगस्ट २0११ च्या सामंजस्य कराराप्रमाणे इतर काही मतभेद असल्यास त्या मुद्दय़ांवर तत्काळ वाटाघाटी करण्यात याव्यात. यासाठी पालिका कर्मचार्यांचे शिष्टमंडळ महापौर आणि आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याचे शरद राव यांनी सांगितले. इतर संघटनांचे कर्मचारी आणि करारावर स्वाक्षर्या केलेल्या कर्मचार्यांनाही पूर्वलक्षी प्रभावाने निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीचाही या निवेदनात समावेश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे मे २00८ नंतर भरती झालेल्या कर्मचार्यांना पेन्शन योजनेचे फायदे देण्यात यावे, मार्च२00५ नंतर जे कर्मचारी कोणत्याही कारणाने सेवेत राहिले नाहीत, त्या सर्वांना न्यायालयाच्या आदेशानुसार लाभ देण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे राव यांनी या वेळी सांगितले. पालिकेतील वैद्यकीय अधिकार्यांनी स्वाक्षरी केलेल्या करारानुसार त्यांना कमी फायदे मिळत असल्याने त्यांनाही या आदेशाचे फायदे मिळवण्यासाठी आपण प्रशासनाबरोबर चर्चा करणार असल्याचे राव यांनी सांगितले. |
Post Top Ad
12 April 2013
Home
Unlabelled
मनपा कर्मचार्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा - औद्योगिक न्यायालय
मनपा कर्मचार्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा - औद्योगिक न्यायालय
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment