त्यामुळे या दोघांचाही गुन्हा एकसारखाच असून संजयला अजिबात माफी देण्यात येऊ नये, असे उमा भारती म्हणाल्या. ९३च्या बॉम्बस्फोटानंतरही संजयचे डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे उघड झालेले असतानाही त्याच्या माफीची शिफारस करणारी मंडळी मतांसाठी गलिच्छ राजकारण करत आहेत. संजय दत्त एक गुन्हेगार, देशद्रोही असून त्याची शिक्षा माफ करण्यात येऊ नये. तसेच त्याला माफ करण्याची मागणी करणार्यांनाही देश कधी माफ करणार नाही, असेही त्यांनी या वेळी म्हटले.
माफीनामा राज्यपालांकडून गृहमंत्रालयाकडे
|
मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला माफ करण्यासाठी देण्यात आलेल्या माफीनाम्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कार्यवाही सुरू केली आहे. राज्यपालांच्या सचिवांनी हा माफीनामा पुढील निर्णयासाठी राज्याच्या गृहमंत्रालयाकडे पाठवला असल्याचे सोमवारी राजभवन प्रवक्त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment