वाढते तापमान आरोग्याला घातक
मुंबई - तापमानाचा पारा सतत वाढतोय. बरोबर घामाघूम करणारी, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करणारी आर्द्रताही आहे. हे वातावरण मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तापमान असेच वाढत राहिले तर कामानिमित्त घराबाहेर पडणार्या ६० टक्के मुंबईकरांना स्ट्रोक म्हणजेच अकस्मात मेंदूघात होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
उन्हाच्या संपर्कात आल्यावर आपल्याला घाम येतो. कारण बाहेरच्या तापमानामुळे शरीराचे तापमान नाहक वाढत जाते आणि त्यामुळे घाम येतो. शरीराची ती तापमान नियंत्रणाची स्वतःची व्यवस्था असते, पण २० मिनिटे जरी कडक उन्हात माणूस चालला तरी ती व्यवस्था कोलमडते आणि स्ट्रोक येतो, असे विख्यात न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले.
छत्तीसगड ते कर्नाटकदरम्यान कमी हवेचा दाबपट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्रकिनार्यापासून येणार्या हवेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात उकाडा निर्माण झाला असून, येते तीन-चार दिवस हीच परिस्थिती कायम राहणार आहे.
Post Top Ad
29 April 2013
Home
Unlabelled
६० टक्के मुंबईकरांना ‘सन स्ट्रोक’चा धोका
६० टक्के मुंबईकरांना ‘सन स्ट्रोक’चा धोका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment