ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बेकायदेशीर बांधकाम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 April 2013

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बेकायदेशीर बांधकाम

तक्रार करूनही कारवाही नाही 
मुंबई /अजेयकुमार जाधव 
ठाणे जिल्ह्यातील हॉटेल कुंजविहार समोर इमारतीचे चार माजले बेकायदेशीर असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले असतानाच ठाणे कोर्टनाका परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वारा समोरच इमारतीचे बांधकाम गौणखनिज उत्खनन परवाना न घेताच केल्याचा आणखी एक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी ठाणे कोर्ट नाका येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गेट नंबर ४, शाळा क्रमांक १ जवळील साई बाबा मंदिराच्या मागील बाजूस विकास प्रस्ताव क्रमांक २००७ / ८५ वर इमारतीचे बांधकाम करताना तहसीलदार कार्यालयाकडून गौणखनिज उत्खनन परवाना घेतला होता का याची माहिती जानेवारी २०१३ मध्ये मागविली होती. 

याबाबत माहिती देताना सन २००९ - १३ पर्यंत गौणखनिज उत्खनन परवानगी दिल्याबाबतच्या नोंदवही नुसार कोर्टनाका येथे जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील या बांधकामाला गौणखजिना उत्खननाबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे नायब तहसीलदार (महसुल) यांनी फेब्रुवारी २०१३ मध्ये कळविले आहे. 

कोर्टनाका परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच गौणखनिज उत्खनन परवाना न घेताच बेकायदेशीररित्या इमारतीचे बांधकाम केल्याने विकासकावर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाही करावी अशी मागणी पारगावकर यांनी ठाणे महानगर पालिका आयुक्त यांना मार्च २०१३ मध्ये लेखी तक्रारीद्वारे केली होती. परंतू सदर तक्रार देवून एक महिना झाला तरी कोणतीही कारवाही झाली नसल्याने आयुक्तांनी स्वतः लक्ष देवून संबंधितांवर कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी पारगावकर यांनी केली आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad