मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या पथकाने घाटकोपर येथे छापा टाकून तब्बल साडेसहाशे लिटर घातक रसायन जप्त केले असून या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
याबाबत पालिका अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किफायत उल्ला वल्ली मोहम्मद खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो घाटकोपर पश्चिमेकडील दर्गा रोडवरील गुरुनानक नगरमध्ये घातक रसायनांचा कारखाना चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त(विशेष) राजेंद्र भोसले, अनुज्ञापक अधीक्षक भगवान साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुज्ञापक निरीक्षक पथकातील मधुकर पावसकर, मिलिंद किर, राजेश परमार, अवधूत पेडणेकर, सुरेश जावळे, गणेश मुधोळ यांनी या कारखान्यावर छाप टाकला. तेव्हा तेथे चार ड्रम घातक रसायने आढळून आली. तब्बल साडेसहाशे लिटर घातक रसायनाचे हे ड्रम अधिकार्यांनी तातडीने ताब्यात घेऊन सील केले. जप्त केलेले हे रसायन सध्या पालिकेच्या देवनार येथील गोदामात ठेवण्यात आले आहे. किफायत उल्ला याला अटक करण्यात आली आहे. त्याने कोठून व कशासाठी हे रसायन आणले, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
No comments:
Post a Comment