ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधली फूट चव्हाट्यावर आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी सर्व गट एकत्र येणे गरजेच असताना, रिपाइंच्या जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिवांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन विभिन्न भूमिका मांडली. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यांनी तर रिपाइंत फूट पडल्याचे जाहीर केल्याने ही गटबाजी उघड झाली आहे. ठाण्यातील आंबेवाडी परिसरात आंबेडकर जयंतीदिनाच्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर शिवसैनिक आणि भीमसैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. शिवसेना आणि रिपाइंच्या नेत्यांची बैठक होऊन दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा बसविण्याचा आणि बुद्धविहार बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी प्रथम रिपाइंचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक राम तायडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा वाद समापोचाराने मिटवावा, अशी भूमिका मांडली. यानंतर रिपाइंचे प्रदेश सचिव भास्कर वाघमारे आणि माजी जिल्हाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आंबेवाडीच्या संपूर्ण घटनेला शिवसेनेचे आ. एकनाथ शिंदे जवाबदार असून ते हा वाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगत पोलीस निरीक्षक सुनील मोरे याच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली तसेच गुरुवारी मोर्चा काढण्याचे जाहीर केले. या वेळी त्यांना एकाच पक्षाची वेगवेगळी भूमिका का, असा प्रश्न माजी जिल्हाध्यक्ष राजय गायकवाड यांना केला असता, त्यांनी पक्षात उभी फूट पडल्याचेच सांगून टाकले. या पत्रकार परिषदेला सुनील खांबे, सुखदेव उबाळे, बाबासाहेब कांबळे आदी उपस्थित होते. |
डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना
No comments:
Post a Comment