मुंबई : बेस्ट कर्मचार्यांना मनपा कर्मचार्यांप्रमाणेच बोनस द्यावा व वेतनकरारापोटीची थकबाकी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी बेस्ट वर्कर्स युनियनतर्फे कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. बेस्ट वर्कर्स संघटनेतर्फे शरद राव व शिष्टमंडळाने महापौर सुनील प्रभू, पालिका आयुक्त सीताराम कुंटे, बेस्ट महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांची भेट देऊन त्यांना निवेदन देण्यात आले. पालिका कर्मचार्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचार्यांनाही बोनस मिळावा, यासाठी आपण बेस्ट महाव्यवस्थापकांशी चर्चा करणार असल्याचे महापौरांनी सकारात्मक आश्वासन दिले. तसेच बेस्ट महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी ७ व ८ मे रोजी बेस्ट कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
Post Top Ad
18 April 2013
Home
Unlabelled
बेस्ट कर्मचार्यांचा थकबाकी व बोनससाठी मोर्चा
बेस्ट कर्मचार्यांचा थकबाकी व बोनससाठी मोर्चा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment