भोपाळमध्ये मेहीद्पुरवाला फर्निचरने बनवली २५ फुटाची खुर्ची - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 April 2013

भोपाळमध्ये मेहीद्पुरवाला फर्निचरने बनवली २५ फुटाची खुर्ची

IMG_3841.jpg
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार  
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मध्य भारतात फर्निचर उद्योग निर्मिती क्षेत्रांत अग्रगण्य ब्रांड असलेल्या भोपाळ येथील मेहीद्पुरवाला फर्निचरने भारतातील सर्वात मोठी "दी ग्रांड एम" नावाची खर्ची नुकतीच सदर केली. 

गेली १२८ वर्षे परंपरा असलेल्या मेहीद्पुरवाला फर्निचरच्या सी २१ मॉल, होशंगाबाद रोड येथील साठ हजार फुट चौरस फुटाच्या शो रूम मध्ये या खुर्चीचे उद्घाटन संपन्न झाले. हि खुर्ची २ टन वजनाची असून "दी ग्रांड एम" या खुर्चीचा आकार दोन माजली इमारती इतका आहे. या खुर्चीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे. या आधी दोन टन वजन व २० फुट उंच खुर्चीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. सदर खुर्चीच्या उद्घाटन प्रसंगी वैविध्यपूर्ण रॉकब्यांड तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील सर्वात उंच अशी खुर्ची पाहण्यास सध्या लोकांनी  केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad