मुंबई : महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या एलबीटीच्या (स्थानिक संस्था कर) विरोधात मुंबईतील सर्व घाऊक व्यापारी, व्यापारी संस्था तसेच छोटे-छोटे दुकानदार १ मे २0१३ पासून अनिश्चित काळासाठी बंद पुकारणार आहेत. या बंदमध्ये माथाडी कामगार, हॉटेल व्यावसायिक तसेच वाहतूकदारांनाही सामील होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
व्यापारी कर भरण्याच्या विरोधात नसून एलबीटीसाठी त्यांना पुन्हा पालिकेबरोबर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे, त्याला विरोध आहे. महाराष्ट्राचे ग्राहक अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात अधिक किंमत मोजत असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गुरनानी यांनी सांगितले. यामुळे महागाई आणखी वाढणार आहे. तसेच व्यापार्यांकडून एकच कर वसूल करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
दरम्यान, व्यापार्यांच्या बंदच्या आंदोलनात भाजपा तसेच आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला असून, इतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनाही आपली बाजू समजावून सांगण्यात येणार असल्याचे गुरनानी यांनी सांगितले. जो राजकीय पक्ष व्यापार्यांच्या बाजूने उभा राहील त्यांच्याच बाजूने आगामी निवडणुकीत मतदान केले जाणार असून, इतर पक्षांवर व्यापार्यांचा बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा गुरनानी यांनी दिला.
No comments:
Post a Comment