या वर्षी मान्सून सामान्य राहील, असा अंदाज जयपाल रेड्डी यांनी बोलून दाखवला आहे. तसेच यंदाचा मान्सून ९८ टक्के होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. यात चार ते पाच टक्के घट होण्याची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातही सर्वसाधारण पाऊस होईल, असे ते म्हणाले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही गेल्याच आठवड्यात मान्सून समाधानकारक होईल, असे हवामान खात्याचा दाखला देत म्हटले होते.
त्यापूर्वी 'स्काईमेट' नामक हवामानाची माहिती देणार्या एका खाजगी कंपनीनेही यंदा देशात चांगला पावसाळा राहील, असा अंदाज वर्तवला होता. जूनमध्ये पूर्वनिर्धारित वेळेत मान्सूनचे देशात आगमन होईल आणि त्यानंतर सप्टेंबरपर्यंत पाऊस होईल. ऑगस्ट महिन्यात मान्सून काहीसा कमजोर होईल. मात्र त्यानंतर पुढील महिन्यातच पुन्हा एकदा तो देशभरात सक्रिय होईल, असेही 'स्काईमेट'ने म्हटले होते. यंदा 'सर्वाधिक' पाऊस होण्याची शक्यता १५ टक्के असून 'सामान्य ते जास्त' पाऊस होण्याची २९ टक्के शक्यता आहे. याशिवाय 'सामान्यपेक्षा कमी' पाऊस होण्याची ९ टक्के, तर 'दुष्काळाची' अवघी ३ टक्के शक्यता असल्याचेही 'स्काईमेट'ने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment