मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एकूण १७ प्रभाग समित्यांपैकी आठ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाने पाच जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून तीन समित्यांवर समाधान मानावे लागले. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत आर/उत्तर प्रभागात भाजपाच्या मनीषा चौधरी, तर पी/दक्षिण प्रभागात वर्षा टेंभुलकर या बिनविरोध निवडून आल्या. ए, बी आणि ई प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वकारुन्नीसा यांना ९ तर शिवसेनेच्या गणेश सानप यांना चार मते मिळाली. याठिकाणी अधिक मते मिळाल्याने वकारुन्नीसा यांना विजयी घोषित करण्यात आले. सी आणि डी प्रभागात शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांना एकूण ९ मते तर दोषी यांना केवळ एका मतावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे दोषी यांनी स्वत:चे मतही दुधवडकर यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एफ/दक्षिण प्रभागात शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी काँग्रेसच्या कचरू यादव यांचा सात मतांनी पराभव केला. विश्वासराव यांना ११ तर यादव यांना चार मते मिळाली. आर/दक्षिणमध्ये काँग्रेसच्या डॉ. अंजता यादव यांनी शिवसेनेच्या कवठणकर यांच्यावर एक मताने मात करत विजय मिळवला. आर-आर उत्तर/मध्य प्रभाग समितीवर भाजपाच्या मनीषा चौधरी या बिनविरोध निवडून आल्या, तर जी-दक्षिण प्रभागात राष्ट्रवादीच्या सुनील अहिर यांनी बाजी मारली. पी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदीही शिवसेनेच्या वर्षा टेंबुलकर यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, सात प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका २0 एप्रिल रोजी होणार असून एफ/पूर्व, एम/पश्चिम या दोन प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी २२ एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. एम/पूर्व आणि एम/पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. एम/पूर्व प्रभागात शिवसेना-भाजपाच्या पाठिंब्यावर भारिपच्या अरुण कांबळे यांनी अर्ज सादर केला आहे, तर त्यांच्याविरोधात समाजवादी पार्टीच्या शांताराम पाटील यांनी अर्ज भरला. या प्रभागात अध्यक्षाच्या मतांवर विजयी उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. एम/पश्चिम प्रभागात भाजपाकडून राजश्री पालांडे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने अनिल पाटणकर यांना संधी दिली आहे. या प्रभागात सत्ताधारी आणि आघाडी यांचे संख्याबळ चार-चार असे समान असल्याने अध्यक्षपदाचे भवितव्य चिठ्ठीवर अवलंबून असेल. |
Post Top Ad
19 April 2013
Home
Unlabelled
आठ प्रभाग समिती अध्यक्षपदांचे निकाल जाहीर
आठ प्रभाग समिती अध्यक्षपदांचे निकाल जाहीर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment