म्हाडा कार्यालयामधील प्रसाधनगृहात महिलांना लपून बघण्याचा प्रकार उघड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2013

म्हाडा कार्यालयामधील प्रसाधनगृहात महिलांना लपून बघण्याचा प्रकार उघड


mhada.jpg
मुंबई / अजेयकुमार जाधव  
महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या म्हाडाच्या बांद्रा कलानगर येथील गृहनिर्माण भवनात महिलांना प्रसाधनगृहात असताना पुरुष सफाई कर्मचाऱ्याने लपून बघण्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आल्याने म्हाडामध्ये महिला असुरक्षित असल्याची बाब उघड झाली आहे. 

गृहनिर्माण भवनात तळमजल्यावर मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या कार्यालय समोरच महिला व पुरुष कर्मचार्यांसाठी प्रसाधनगृह आहे. महिलांसाठीचे प्रसाधनगृह पुरुष अधिकाऱ्यांच्या प्रसाधन गृहाला लागून असून मध्ये फक्त एक छोटीशी भिंत आहे. कोणीही या छोट्याश्या भिंतीवर चढून महिलांच्या प्रसाधागृहात डोकावू शकतो अशा प्रकारे हि प्रसाधनगृह बांधण्यात आली आहेत. याचाच फायदा घेत शुक्रवारी सकाळी एका कंत्राटी सफाई कर्मचारी पुरुषांचे प्रसाधनगृह स्वच्छ करत असताना भिंतीवर चढून महिलांच्या प्रसाधनगृहात लपून पाहत असल्याचा प्रकार एक महिला कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आल्यावर सदर महिलेने आरडाओरड केल्याने हा प्रकार उघड झाला आहे. 

सदर महिलेने आरडा ओरड करताच महिलांना प्रसाधनगृहामध्ये असताना लपून पाहणारा कंत्राटी सफाई कर्मचारी तेथून पळून गेला असल्याने संतापलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी याबाबत म्हाडाच्या विजिलन्स विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सदर महिला कार्माचारीने सांगितले आहे. सदर प्रकार घडल्याचे माहित पडताच म्हाडामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून या प्रकरणाची प्रशासन व अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेत महिलांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यावे, महिलांची प्रसाधनगृहे महिलांनाच सफाई करण्यासाठी द्यावीत अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.  

तक्रार आल्यास कारवाही करू - म्हाडा
असा प्रकार झाल्याची म्हाडाकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. त्या महिला म्हाडाच्या कर्मचारी नाहीत. त्या महिलेने तक्रार केल्यास आम्ही पुढील कारवाही करू. म्हाडामधील महिला व पुरुषांची प्रसाधनगृहे छोट्या भिंती घालून बनवण्यात आल्या आहेत त्याचा एक आठवड्यात आढावा घेवून संपूर्ण भिंती घालून महिला व पुरुषांची प्रसाधनगृहे वेगवेगळी करण्याच्या, महिलांच्या प्रसाधनगृहामधील फुटलेल्या काचा नवीन लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सफाईचे कंत्राट दिलेल्या संस्थेच्या सफाई कर्मचाऱ्याने असा प्रकार केला असल्याने सदर कंत्राट दिलेल्या महिलेला बोलावून कंत्राट रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे. 
वैशाली संदानसिंग
मुख्य जनसंपर्क अधिकारी (म्हाडा)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad