२ मेपासून एसटी कर्मचारी संपावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 April 2013

२ मेपासून एसटी कर्मचारी संपावर


किमान वेतन, सेवेचे भत्ते यासह अन्य मागण्यांना घेऊन एसटी ड्रायव्हर, कंडक्टर व मॅकेनिक युनियनचा एसटी महामंडळासोबत लढा सुरू असून या मागण्यांची त्वरित पूर्तता करण्यात आली नाही, तर येत्या २ मेपासून सर्व कर्मचारी संपावर जाणार, असा इशारा युनियनने दिला आहे. किमान वेतनाप्रमाणे ४0 टक्के ग्रेड पे मिळावा, चालक/वाहक यांत्रिक यांना श्रेणी तीनचा दर्जा मिळावा, अत्यावश्यक सेवेचा भत्ता अदा करण्यात यावा, कनिष्ठ वेतन श्रेणी २000 पासून ३ वष्रे करण्यात यावी व त्यांना फरक व व्याजासह पैसे देण्यात यावेत, १७ व १८ सप्टेंबर २0१२ रोजी उपोषणकर्त्यांवर केलेली कारवाई मागे घेण्यात यावी, ३१ मार्च २0१२ रोजी पूर्ण करार केला नाही म्हणून मान्यता प्राप्त संघटनेची मान्यता रद्द करावी व १३ टक्के एसटी कामगार वेतन करार हा कामगारांना अन्यायकारक वाटत असून त्याचा विरोध करण्यात यावा या मागण्या युनियन करीत आहे. या मागण्यांची पूर्तता त्वरित न झाल्यास येत्या २ मेपासून युनियन संपावर जाणार, असा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad