ठाण्यातील कुंजविहार समोरील अनधिकृत बांधकामाकडे मुख्यमंत्री, आयुक्तांचे दुर्लक्ष - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2013

ठाण्यातील कुंजविहार समोरील अनधिकृत बांधकामाकडे मुख्यमंत्री, आयुक्तांचे दुर्लक्ष


मुंबई / अजेयकुमार जाधव
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शिळफाटा येथील अनअधिकृत इमारत पडल्या नंतर अनधिकृत इमारती पाडाव्यात अशी मागणी केली जात असतानाच हॉटेल  कुंजविहार समोरील एका इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे मुख्यमंत्री पालिका आयुक्त यांना २०१० साली कळवूनही अद्याप कारवाही केली नसल्याचे उजेडात आले आहे. 

ठाण्यातील कुंजविहार हॉटेल शेजारी सीटीएस क्रमांक ३०७ व ३०८ वर एक आठ मजली इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे ४ मजले अनधिकृत असल्याचे ठाणे महानगर पालिकेने माहिती अधिकारात आनंद पारगावकर या माहिती अधिकार कार्यकर्त्याला कळविले होते. या इमारतीचे  ४ मजले अनधिकृत असल्याचे समजल्यावर पारगावकर यांनी मुख्यमंत्री, ठाणे महानगर पालिका आयुक्त, उप आयुक्त अतिक्रमण विभाग, सहाय्यक आयुक्त नौपाडा प्रभाग समिती यांना ३० नोव्हेंबर २०१० रोजी लेखी तक्रार दिली होती. 

अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार करूनही याबाबत ठाणे महानगर पालिका कारवाही करण्यास दुर्लक्ष करत असल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , ठाणे महानगर पालिका आयुक्त, उप आयुक्त अतिक्रमण विभाग, सहाय्यक आयुक्त नौपाडा प्रभाग समिती यांना १४ डिसेंबर २०१२ रोजी पुन्हा पत्र पाठवून कारवाही करावी अशी मागणी केली आहे. तसेच ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय यानाही पत्र लिहून अनअधिकृत बांधकामावर कारवाही करावी यासाठी ठाणे महानगर पालिकेला आदेश द्यावेत अशी मागणी केली असता न्यायालयाने हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी हे पत्र १८ डिसेंबर २०१२ रोजी पालिकेकडे अग्रेषित केले आहे. 

एका अनधिकृत बांधकामाची तक्रार तीन वर्षापूर्वी करून सुद्धा मुख्यमंत्री, ठाणे महानगर पालिका आयुक्त या अनधिकृत बांधकामावर कारवाही करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून अनधिकृत बांधकामाला मुख्यमंत्री, ठाणे महानगर पालिका आयुक्त अभय का देत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री, ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी वेळीच कारवाही केल्यास ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामे उभीच राहू शकत नाहीत असे नागरिकाकडून बोललले जात आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad