मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (2012-13) (ता. 13) वरळीत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुरस्कार वितरित करतील.
वरळीतील महात्मा गांधी उद्यान, जांबोरी मैदानावर उद्या सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलिंद देवरा, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, ग्रामविकास तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री सचिन अहिर, मुंबईचे महापौर सुनील प्रभू उपस्थित राहणार आहेत. राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या आणि विमुक्त जाती-जमाती, इतर मागासवर्गीय जाती तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी आदींच्या कल्याणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. या वर्षी 51 व्यक्ती आणि 10 संस्थांना या पुरस्कारांनी गौरवण्यात येईल. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 25 हजार रुपये (व्यक्ती) आणि 50 हजार रुपये (संस्था) असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

No comments:
Post a Comment