१ मेपासून पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 April 2013

१ मेपासून पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त होणार

नवी दिल्ली : महागाईचे चटके सोसणार्‍या सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार असून १ मेपासून पेट्रोलचे दर दीड ते दोन रुपयांनी कमी केले जाणार आहेत. तसे स्पष्ट संकेत पेट्रोल कंपन्यांनी दिले आहेत. जागतिक बाजारपेठेत सध्या मोठय़ा प्रमाणात उलथापालथ सुरू असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत आहे. आधी सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही सतत बदल होत आहेत. पंधरवड्यापूर्वीच पेट्रोलचे दर १ रुपया २६ पैशांना कमी करण्यात आले होते. मुंबईमध्ये पेट्रोलचा लिटरमागचा दर ७२ रुपये ८८ पैसे झाला होता. त्यात आता दीड ते दोन रुपयांचा आणखी दिलासा सामान्यांना मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad