मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्वाच्च भाषेत विधान करताना प्रभाकर देशमुख यांचे नाव घेतले म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडिया देशमुखांसारख्या सामान्य शेतकर्याची 'बाईट' घेण्यासाठी आझाद मैदानाकडे पळत सुटला. परंतु मागील वर्षानुवर्षे आझाद मैदानात या-ना-त्या माध्यमातून लढा देणार्या सामान्य घटकाला न्याय मिळवून देण्यास इलेक्ट्रॉनिक मीडियाला वेळ नाही. सामाजिक जाणीव विसरलेल्या या मीडियाविरोधात ' कॅमेरे तोडफोड आंदोलन' करण्याचा इशारा उपेक्षित घटकांनी दिला आहे. राज्यात भीषण दुष्काळ पडल्याने सरकारला जागे करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रभाकर देशमुख आझाद मैदानात उपोषणास बसले. त्यांच्या उपोषणाचे ५0-५५ दिवस उलटल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांच्याकडे धावला. तेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोंडून त्यांचे नाव बाहेर पडल्यामुळे. एखादा राजकीय नेता आंदोलनकर्त्याचे नाव घेतो म्हणून त्या आंदोलनकर्त्याची 'बाईट' घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाने धाव घेणे आणि वर्षभर आंदोलनाला बसणार्या सामान्य माणसाकडे ढुंकूनही न पाहणे. हा मीडियाचा भेदभाव कशासाठी असा सवाल करत उपेक्षित, वंचित घटकांनी मीडियाविरोधात कॅमेरे तोडफोड आंदोलनाचा इशारा दिला आहे. गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी मीडियाने स्वत:हून घटनास्थळी जाऊन सामाजिक कर्तव्य निभवावे. परंतु याकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय नेता वा सेलिब्रेटी काही बोलला तरच आंदोलनाकडे धावणे ही मीडियाची वृत्ती योग्य नाही, असे आश्रमशाळा संघटनेचे अध्यक्ष मधुकर वजाळे यांनी बोलताना सांगितले. ते मागील वर्षभर केंद्र पुरस्कृत आश्रमशाळांचा प्रश्न घेऊन लढा देत आहेत. |
Post Top Ad
13 April 2013
Home
Unlabelled
इलेक्ट्रॉनिक मीडियाविरोधात कॅमेरे तोडफोड आंदोलनाचा इशारा
इलेक्ट्रॉनिक मीडियाविरोधात कॅमेरे तोडफोड आंदोलनाचा इशारा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment