म.रे.च्या अतिरिक्त १५ डबा लोकलसाठी प्रतीक्षा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 April 2013

म.रे.च्या अतिरिक्त १५ डबा लोकलसाठी प्रतीक्षा

मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या सीएसटी ते कल्याण १५ डब्यांची अतिरिक्त लोकलसाठी जून महिना उजाडण्याची शक्यता आहे. तांत्रिक तसेच रेकची अनुपलब्धता यामुळे ही लोकल एक महिना लांबणीवर पडली आहे.

मध्य रेल्वेवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीएसटी ते कल्याण ही १५ डब्यांची पहिली लोकल धावली होती. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता आणखी एक १५ डब्यांची लोकलची घोषणा १५ एप्रिल रोजी करण्यात आली होती. मात्र अपेक्षित लोकल मिळण्यात होणारा विलंब आणि इतर कारणे या अतिरिक्त लोकलच्या प्रवासात विघ्ने आणत आहेत. ठाणे ते कल्याण तीन आणि चार ट्रॅक, एलटीटीदरम्यान पाच आणि सहा ट्रॅकमध्ये डीसी ते एसी परावर्तनचे काम मे महिन्यात पूर्ण होणार आहे. यानंतर नवी लोकल उपलब्ध झाल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आल्यावर प्रत्यक्षात लोकल धावणार आहे. विशेष बाब म्हणजे या लोकलमध्ये पाच डबे महिलांसाठी राखीव असणार आहेत. या पाच डब्यातील अर्धा डबा अपंग प्रवासी, दीड डबा फस्र्ट क्लास आणि तीन डबे सेकंड क्लासासाठी राखीव असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad