सातार्‍यात आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 April 2013

सातार्‍यात आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना



सातारा : येथील माजगावकर माळ परिसरातील सिद्धार्थ प्रतिष्ठानच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी विटंबना केली. पुतळ्याची विटंबना केल्याचे शुक्रवारी सकाळी लक्षात आल्यानंतर आंबेडकर अनुयायींनी त्या घटनेचा निषेध करत सातारा बंदची हाक देत मोर्चा काढला. या मोर्चावेळी काही दुकाने तसेच बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली. सातार्‍याबरोबरच वाई, फलटण व इतर ठिकाणीही पुतळा विटंबनेचे तीव्र पडसाद उमटले. सातार्‍यात पुकारण्यात आलेल्या बंदचा फटका बाहेरगावाहून आलेल्या सर्वसामान्यांना मोठय़ा प्रमाणात बसला. येथील माजगावकर माळ परिसरातील झोपडपट्टीत मोठय़ा प्रमाणात मागासवर्गीय तसेच गोसावी समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहेत. गोसावी समाजातील युवक आणि मागासवर्गीय समाजातील कुटुंबीयांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात वाद सुरू आहेत. या वादाचे पर्यावसन अनेकवेळा छोट्यामोठय़ा मारामार्‍यांमध्येसुद्धा झाले आहे. यामुळे पुतळा विटंबना करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंबेडकर अनुयायींनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad