मुंबई - समाजात वाढत असलेली हिंसक वृत्ती आणि असंवेदनशीलता याला उत्तर देण्यासाठी जैन समाजाने "अहिंसा मॅरेथॉन'चे आयोजन केले आहे. येत्या 21 एप्रिल रोजी नरिमन पॉंइट येथील ट्रायडन्ट हॉटेल येथून या मॅरेथॉनची सुरुवात होणार असून ऑगस्ट क्रांती मैदानात सांगता होईल.
"जितो'या जैन समाजाच्या संस्थेकडून दरवर्षी अहिंसा यात्रेचे आयोजन केले जाते. त्यात धर्मगुरूंचीही उपस्थिती असते. समाजातील सर्व समूहांना एकत्र आणून त्यांच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश देण्यासाठी ही यात्रा असल्याचे "जितो' च्या वाळकेश्वर येथील संस्थेचे संचालक राजेश वरधान यांनी सांगितले. प्रत्येक वर्षी महावीर जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम या संस्थेकडून घेण्यात येतात.
अहिंसा हे जैन धर्माचे प्रमुख तत्त्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये समाजाच्या विविध स्तरांमध्ये अस्वस्थेचे वातावरण आहे. स्त्री-भ्रूणहत्या, वाढता भ्रष्टाचार, विसंवाद अशा विविध कारणांमुळे सामाजिक स्वास्थ्य लोप पावत आहे. सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या तत्त्वाचे काटेकोर पालन करण्याची निकड "जितो'ने व्यक्त केली. जागतिक शांती आणि स्थैर्यासाठी समाजस्वास्थ्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालये, वसतिगृहातील तरुणांपासून कॉर्पोरेटमधील युवांना एकत्र आणून जोडण्याचा हेतू साध्य होईल, अशी आशा "जितो' ने व्यक्त केली. जैन समाजाकडून जे विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतात. त्यातील अहिंसा मॅरेथॉनचे हे पहिले वर्ष असून यापुढेही हा उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस "जितो' ने व्यक्त केला.
Post Top Ad
13 April 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment