मुंबई : परिचारिकांच्या भरती प्रक्रियेत मुंबई पालिकेच्या परिचार्य शाळेतून उत्तीर्ण झालेल्या खुल्या गटातील मुलींना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या मेरिटनुसार अग्रक्रम देण्यात यावा, असे महापौर सुनील प्रभू यांनी म्हटले आहे. याबाबत आयुक्तांमार्फत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन महापौरांनी परिचारिकांच्या शिष्टमंडळाला दिले.
परिचारिका पदाच्या भरती प्रक्रियेतील जाहिरातमध्ये पालिका परिचार्य शाळेतील परिचारिकांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले आहे. तसेच इतर संस्थेमधून आलेल्या परिचारिकांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते. त्यामुळे पालिकेच्या परिचारिकांवर अन्याय होणार असल्याचे परिचारिकांच्या शिष्टमंडळाने महापौरांना सांगितले. यापूर्वी इतर संस्थेच्या मुलींना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले नसल्यचे शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. खुल्या प्रवर्गातील वर्ष २00२ पर्यंतच्या उमेदवारांची भरती करून घेण्यात आली नाही. वर्ष २00३ पासून ते चालू वर्षापर्यंतच्या उमेदवारांची भरती करून घेण्यात यावी, भरतीसाठी फक्त पालिका उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, भरतीसाठी ज्येष्ठतेनुसार उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, भरतीसाठी एकूण रिक्त पदाचा विचार करून उमेदवारांना बोलविण्यात यावे तसेच तीन वर्ष मनपा रुग्णालयांना सेवा देत असलेल्या ४७ परिचारिकांना भरतीमध्ये समाविष्ठ करण्यात यावे, अशा मागण्या शिष्टमंडळाने महापौरांपुढे ठेवल्या. महापौर प्रभू यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे समजून घेतल्यानंतर याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment