मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी चांदूरकर यांची नियुक्ती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 April 2013

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी चांदूरकर यांची नियुक्ती

दिल्ली - कॉंग्रेसचे माजी आमदार जनार्दन चांदुरकर यांची मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी आज (गुरुवार) निवड करण्यात आली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडून चांदुरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी या पदाबाबत मुंबई दौऱ्यावेळी चर्चा केली होती. या पदाच्या शर्यतीत जनार्दन चांदुरकर यांच्यासह कॉंग्रेस आमदार मधू चव्हाण आणि आमदार भाई जगताप होते. यामध्ये चांदुरकर यांनी बाजी मारली आहे. 
उच्चशिक्षित आणि कायद्याचे उत्तम ज्ञान असलेले चांदूरकर हे मुंबईच्या राजकीय वर्तुळात मराठी दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. एकेकाळी सुनील दत्त यांच्या विश्वासातली व्यक्ती आणि पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते अशी चांदूरकरांची ओळख आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad