बसमध्ये सर्वसाधारण जागांवर महिलांचे अतिक्रमण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 April 2013

बसमध्ये सर्वसाधारण जागांवर महिलांचे अतिक्रमण


मुंबई - बेस्ट बसमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आसने रिकामी असताना अनेक महिला सर्वसाधारण जागांवर बसतात, अशा अनेक तक्रारी बेस्ट उपक्रमाकडे आल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण जागांवर पुरुषांना बसण्यासाठी प्राधान्य द्या आणि महिलांना आरक्षित जागेवर बसण्यासाठी विनंती करा, असे बसवाहकांना सूचना देणारे पत्रकच बेस्टने काढले आहे. 

अनेकदा सुरुवातीच्या थांब्यावरच महिला प्रवासी राखीव आसने रिक्त ठेवून इतर सर्वसाधारण आसनांवर बसतात, अशा तक्रारी बेस्टकडे आल्या आहेत. त्यामुळे पुरुष प्रवाशांची बसमध्ये गैरसोय होते. त्यामुळे बेस्टने तसे पत्रकच काढले आहे आणि त्यानुसार वाहतूक अधिकारी आणि पर्यवेक्षकीय कर्मचारी यांनी मार्ग तपासणीमध्ये या सूचनांची अंमलबजावणी होते का, याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

तब्बल 12 आसने बेस्टने महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवलेली असताना अनेकदा कुटुंबीयांसोबत किंवा पहिल्या थांब्यापासून घराकडे निघालेले महिला प्रवासी सर्वसाधारण आसनांवरही अधिकार दाखविण्याचे प्रकार करतात. ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि महिला प्रवासी अशा आरक्षणात आधीच कमी उरलेल्या सर्वसाधारण जागा यामुळे पुरुषांची गैरसोयीत भर पडली आहे. त्यामुळे अशा तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad