पालिका रुग्णालयांत माफक दरात औषधे दिली जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 April 2013

पालिका रुग्णालयांत माफक दरात औषधे दिली जाणार


मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाच्या आवारातील औषध दुकानांतून माफक दरात औषधे दिली जाणार आहेत. तशी सक्तीच या औषध दुकानांवर केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत दिली. दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर ही योजना राबविली जाणार आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांत मुंबईबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या रुग्णालयांत औषधांचा प्रचंड तुटवडा भासतो. गोरगरीब रुग्णांना खासगी दुकानांमधून महागडी औषधे विकत घ्यावी लागतात. याचे पडसाद अनेकदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत; तसेच स्थायी समितीमध्ये उमटले. त्यानंतर महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी पालिका रुग्णालयांत शून्य औषध प्रणाली राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दिल्ली येथील एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर गोरगरीब रुग्णांना माफक दरात औषधे विकली जातील. पालिका रुग्णालयाच्या परिसरात औषधांची दुकाने भाड्याने दिली जातात. महापालिका त्याचे वार्षिक भाडे घेते; मात्र यापुढे असे भाडे न घेता रुग्णांना सवलतीच्या दरात औषधे देण्याची सक्ती या दुकानांवर केली जाईल.

सत्तर टक्के रुग्ण मुंबईबाहेरचे मुंबई महापालिकेच्या नायर, केईएम आणि लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण हे मुंबई शहरातील असतात. उर्वरित 70 टक्के रुग्ण हे मुंबईबाहेरून येतात, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. बाहेरून येणाऱ्या रुग्णांपैकी 20 टक्के रुग्ण हे राज्याबाहेरील असतात, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad