मुंबई महानगरपालिकेमध्ये कामकाज योग्य प्रकारे चालवण्यासाठी एकूण १ लाख ४0 हजार कर्मचार्यांची आवश्यकता असताना सुमारे २८ हजार ६६१ पदे रिक्त असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रमुख कर्मचारी अधिकारी सातपुते यांनी दिली. मुंबई महानगर जनसंपर्क विभागाकडून आयोजित या विभागाला सादरीकरणात ही माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर २०१२ पर्यंत मुंबई महानगरपालिकेत अ, ब, क, ड या श्रेणीची मिळून सरळसेवा भरतीने भरावयाची १८ हजार ८४३ पदे रिक्त असून ९ हजार ८१८ पदोन्नतीची पदे अशी एकूण २८ हजार ६६१ पदे रिक्त आहेत, तर सर्वात जास्त रिक्त पदे क आणि ड श्रेणीची असून क श्रेणीमध्ये ८ हजार ५८९, तर ड श्रेणीची ८ हजार ३४९ पदे रिक्त असल्याचे सातपुते यांनी सांगितले. यामध्ये क श्रेणीमध्ये १ हजार ३७२ पदे, तर ड श्रेणीतील ३ हजार ७५0 रिक्त पदे पदोन्नतीने भरावयाची आहेत.
या रिक्त पदांमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील मागासवर्गीयांची ३ हजार ८८८ पदे सरळसेवेने तर ६६१ पदे पदोन्नतीने अशी एकूण ४५४९ पदे भरावयाची असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असलेल्या रिक्त पदांमुळे पालिकेच्या विविध विभागांत कामकाजावर परिणाम होत असतो आणि त्याची झळ जनतेला बसते. मात्र ही रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट करत सातपुते यांनी नवृत्त कर्मचार्यांमुळे पुन्हा बॅकलॉग निर्माण होत असल्याचे सातपुते यांनी सांगितले आहे. सातपुते यांनी दिलेली माहिती डिसेंबर २०१२ ची असली तरी सातपुते यांच्याच विभागातील सह प्रमुख अधिकाऱ्यांनी १५ डिसेंबर २०११ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांना दिलेल्या माहितीनुसार मागासवर्गीयांचा पालिकेमध्ये १९ हजार पदांचा अनुशेष बाकी असल्याचे माहिती अधिकारात कळविले होते.
पालिकेचे सहप्रमुख कर्मचारी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीत ३० जून २०११ रोजीच्या आकडेवारी नुसार पालिकेच्या अ, ब, क, ड अशा चार वर्गामध्ये सरळसेवा भर्तीद्वारे ८६०४४ पदे मंजूर आहेत त्यापैकी ६५६९८ पदे भरली असून २०३४६ पदे रिक्त आहेत तर एस. सी. ची २११७, एस. टी. ची ३१०३, विजे (अ) ची १२४३, एन टी (ब) ची ९६४, एन. टी. (सी )ची १३७०, एन टी (डी )ची ९८२, एस. बी. सी. ची ८६४, ओ. बी. सी. ची ४१६६ अश्या एकूण १४८३९ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले आहे. तर पदोन्नतीद्वारे २४१०५ पदे मंजूर आहेत त्यापैकी १४८४४ पदे भरली असून ९२६१ पदे रिक्त आहेत. एस. सी. ची ९१० , एस. टी. ची १०६९ , विजे (अ) ची ४२७, एन. टी. (ब) ची ३२६ , एन. टी. (सी )ची ५३९ , एन. टी. (डी )ची ३५८, एस. बी. सी. ची ३४३ अश्या एकूण ३९७२ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे सरळ सेवा व पदोन्नतीद्वारे मागासवर्गीयांचा १८,८११ पदांचा अनुशेष बाकी असताना खुल्या वर्गातील कोणत्याही पदांचा अनुशेष बाकी नसल्याचे माहिती अधिकारात कळविले होते.
मुंबई महानगर पालिकेमध्ये डिसेंबर २०११ मध्ये मागासवर्गीयांचा १८,८११ पदांचा अनुशेष बाकी होता मागासवर्गीयांची भरती करावी म्हणून पालिका प्रशासनाने कोणतीही विशेष भरती प्रक्रिया किवा भरतीसाठी मोठी मोहीम राबवली नसताना पालिकेमध्ये एक वर्षाने डिसेंबर २०१२ च्या आकडेवारी नुसार फक्त ४५४९ पदे भरायची असल्याचे प्रमुख कर्मचारी अधिकारी यांनी पत्रकारांना सांगितले आहे. यावेळी बोलताना सातपुते यांच्या सोबतच्या महिला कार्माचारयानी हि माहिती आमच्या विभागाने कळवली नसेल ती कोणी कळवली ते पाहावे लागेल असे बोलून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला असला तरी हि माहिती त्यांच्याच विभागाने दिली आहे याचा विसर अधिकाऱ्यांना पडला आहे असेच म्हणावे लागेल.
इतकेच नव्हे तर पालिका सभागृहामध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये नगरसेवक विनोद शेलार यांनी पालिकेमध्ये एकूण २५ हजार पदे रिक्त असून त्यापैकी १९ हजार पदे मागासवर्गीयांची असल्याने हि पदे त्वरित भरली जावीत अशी मागणी केली असता मुंबईच्या महापौर सुनील प्रभू यांनी हि सर्व पदे त्वरित भरावीत असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याचाच अर्थ पालिकेमध्ये सर्वोच्च असलेल्या सभागृहाने सुधा मागासवर्गीयांची १९ हजार पदे रिक्त असल्याचे मान्य केले असताना व हि पदे अद्याप भरली गेली नसताना सातपुते यांनी खोटी व चुकीची माहिती पत्रकारांना का पुरवली याचा पालिकेच्या आयुक्तांनी शोध घेणे गरजेचे आहे. तसेच पालिकेमध्ये मागासवर्गीयांचा १९ हजार पदांचा अनुशेष असताना सातपुते यांनी फक्त ४५४९ पदे भरावयाची बाकी असल्याचे म्हटले असल्याने बाकीची पदे पालिकेने कधी भरली याची खरी माहिती मागासवर्गीयाना कळावी म्हणून हि माहिती जाहीर करण्याचे आवाहन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्वतः स्वीकारावे व मागासवर्गीय भरतीची खरी परिस्थिती लोकांसमोर आणावी.
अजेयकुमार जाधव
मो. 09969191363
No comments:
Post a Comment