अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा वॉच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 April 2013

अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा वॉच

मुंबई- मुंब्य्रातील इमारत कोसळण्याची दुर्घटना आणि उच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर वॉच ठेवण्यासाठी पालिकेने योजना आखली असून त्यानुसार प्रत्येकी तीन वॉर्डांतील अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवण्याची जबाबदारी इमारत व कारखाने विभागातील सहाय्यक अभियंत्यांवर सोपविण्यात आली असून त्यांच्यासोबत एक कनिष्ठ अभियंता देण्यात येणार आहे. तसे प्रतिज्ञापत्रच पालिकेने उच्च न्यायालयात सादर केले आहे.

पालिका सभागृहनेते यशोधर फणसे यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे स्थायी समितीचे मुंबईतील अनधिकृत बांधकामाकडे लक्ष वेधले. पालिकेची नवी योजना १५ एप्रिलपासून लागू होणार आहे. १३ आणि १४ एप्रिल रोजी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र इतर खात्यांतील अभियंते या कामाला जुंपण्यात येणार असल्याने त्या खात्यांच्या कामावर परिणाम होणार नाही का, असा सवाल यशोधर फणसे यांनी केला. वर्सोवा येथे वाळूत इमारती उभ्या राहिल्या असून त्यांच्यावर कारवाई करणार काय, असा सवाल फणसे यांनी केला, तर दिलीप लांडे, शुभा राऊळ, रमेश कोरगावकर, अनुराधा पेडणेकर, किशोरी पेडणेकर, धनंजय पिसाळ, तृष्णा विश्‍वासराव यांनी आपापल्या विभागातील अनधिकृत बांधकामांची यादीच प्रशासनासमोर मांडली.

केंद्र व राज्य सरकारच्याच जागांवर बांधकाम
स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुंबईतील केंद्र, राज्य सरकार आणि इतर प्राधिकरणांच्या जागांवर सर्वाधिक अनधिकृत बांधकामे असल्याने तशी न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती द्या. न्यायालयाची दिशाभूल करू नका, असे आदेश प्रशासनाला दिले. अनधिकृत बांधकामांवर वॉच ठेवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याचे पद निर्माण करताना या अभियंत्यासोबत पोलीस आणि विधी अधिकार्‍यांची टीम देण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच अनधिकृत बांधकाम हटविण्याचा कृती आराखडा सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad