मुंबई / http://jpnnews.webs. com
लहान मुलांसाठी फोकस ग्रुप या डिजिटल मीडिया कंपनीने एक नवी सोशल नेटवर्किंग साईट आणली आहे. "वर्ल्डू' www.worldoo.com असे या संकेतस्थळाचे नाव असून खेळ, ज्ञान आणि सोशल नेटवर्किंगचा मुलांना एकाच ठिकाणी एकाच वेळी आनंद घेता येणार आहे. फेसबुकप्रमाणे या संकेतस्थळावर मुलांना फ्रेण्डस बनवता येणार असून चॅटिंगही करता येणार आहे.
या संकेतस्थळासाठी कंपनी गेली अडीच वर्षे काम करीत होती. या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असे, की येथे गेमिंगसाठी प्रसिद्घ संकेतस्थळांचे गेम्स, नॅशनल जिओग्राफिक आणि जेफकॉर्विनकनेक्टसारख्या पर्यावरणाला वाहिलेल्या वाहिन्या, वॉर्नर ब्रदर्स, शिमारू, सोनी पिक्चर्ससारख्या चित्रपट कंपन्या, कार्टून नेटवर्क, झीक्यू हे शैक्षणिक मनोरंजन चॅनेल, चंपक, अमर चित्रकथा, ब्रिटानिका, क्रॉसवर्डस्ची कॉमिक्स पुस्तके एकत्र आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आनंद गेम खेळता खेळता किंवा गेमचाच एक भाग म्हणून लुटता येणार आहे. म्हणूनच हे संकेतस्थळ म्हणजे मुलांसाठी प्रथमच एक ऑनलाइन इकोसिस्टीम आहे, असा कंपनीचा दावा आहे. या संकेतस्थळात सतत बदल होत राहणार असल्याची माहिती फोकस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मोनिश घटालिया यांनी दिली. वल्डू हे वेब जगतातले पहिले असे संकेतस्थळ आहे, जेथे मुलांना अभिव्यक्त होण्याचा आणि खेळण्याचा असा एकत्रित आनंद घेता येणार आहे. यात शैक्षणिक विषयांचे वाचन करून मुले स्टार्स कमावू शकतात. या कमावलेल्या स्टार्सचा विनियोग करून मुलांना अंतिमत: स्वत:चे घर सजवायचे असते. त्यायोगे त्यांना पैशांचे मूल्यही कळून आर्थिक धडेही मिळणार आहेत.
No comments:
Post a Comment