युतीवर दबावासाठी आठवलेंचा राज्य दौरा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 April 2013

युतीवर दबावासाठी आठवलेंचा राज्य दौरा


मुंबई- शिवसेनेने मुंबईतील लोकसभेचे उमेदवार निश्चित केल्याची कुणकुण लागताच खडबडून जागे झालेले रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी घाईघाईने आपल्या राज्यव्यापी दौर्‍याची आखणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा दौरा काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध करण्यासाठी नसून जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपवर दबाव वाढवण्यासाठीच असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच आठवलेंनी पत्रकार परिषद घेऊन ‘आम्हाला सन्मानाची वागणूक द्या’, असा इशारा दिला होता. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रालोआत रिपाइंला सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मागील वेळीप्रमाणे फरपट होऊ नये, यासाठी आठवले आतापासूनच सतर्क झाले आहेत. पक्षाची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई या विभागात त्यांच्या सभा होणार आहेत.

सभा कुठे होणार 
1 मे - पुणे, बी.जे. मेडिकल कॉलेज मैदान
11 मे- नाशिक, भालेकर मैदान 
19 मे- बीड, सर्कस मैदान
26 मे- मुंबई-कुर्ला, शिवाजी मैदान
1 जून - सोलापूर, नॉर्थकोट मैदान

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad