मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी २५७२ अपघात झाले असून त्यात २५४ जण मरण पावले. या अपघातांमध्ये ७0७ जण गंभीर तर ७0६ जण किरकोळ जखमी झाले. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विजय गिरकर यांनी विधान परिषदेत मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेच्या निवेदनात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी या महामार्गावर २२५ प्राणांतिक अपघात झाले. त्यात २५४ माणसे दगावली. २९२ अपघातांमध्ये ७0७ जण गंभीर तर २२१ अपघातांमध्ये ७0६ जण किरकोळ जखमी झाले. २00७ पासून २0१२ अखेरपर्यंत या महामार्गावर एकूण १५ हजार ३५७ अपघात झाले. यातील ११९0 प्राणांतिक अपघातांमध्ये १४७६ जण लोक मरण पावले. कशेडी ते खारेपाटण मार्गावर गेल्या वर्षी ७१ प्राणांतिक अपघातांमध्ये ९0 जण ठार झाले. ९४ गंभीर अपघातांमध्ये २२१ तर १0६ किरकोळ अपघातांमध्ये ४१५ जण जखमी झाले. १६७ अपघातांमध्ये कोणाला दुखापत झाली नाही. २00७ पासून डिसेंबर २0१२ पर्यंत या मार्गावर ३७६ प्राणांतिक अपघातात ४६६ माणसे दगावली. ५0६ गंभीर अपघातांमध्ये १२५९ तर ६५0 किरकोळ अपघातात २१४१ लोक जखमी झाले, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या वर्षी झालेल्या १२५९ अपघातांपैकी ६८५ अतिवेगाने वाहन चालवल्याने, १९0 ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात, ९५ अपघात मागून धडक बसल्याने, १५ अचानक ब्रेक लावल्याने, १0 अपघात वाहनांचे टायर फुटल्यामुळे, १३ प्रखर लाईट्समुळे तर ८३ अपघात टायर स्लीप झाल्यामुळे झाले. माल वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वेगर्मयादा न राखल्याने झालेल्या अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचेही भुजबळ यांनी या निवेदनात म्हटले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामात इंदापूर ते संगमेश्वर भागात ९0 कोटी, संगमेश्वर ते राजापूर पट्टय़ात ९0 कोटी, राजापूर ते झाराप भागात ९६ कोटी रुपये लागणार असल्याचे भुजबळ यांनी विनायक निम्हण व इतरांच्या विधानसभेत दिलेल्या लक्षवेधी सूचनेच्या निवेदनात म्हटले आहे. |
Post Top Ad
25 April 2013
Home
Unlabelled
मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या वर्षी २५७२ अपघात
मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या वर्षी २५७२ अपघात
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment