मुंबई - २६-११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन केलेल्या फोर्स वनच्या एका २५ वर्षीय कमांडोने कलिना पोलीस कॅम्पस्मध्येच गोळी झाडून आत्महत्या केली. नंदलाल सोनावणे असे त्या कमांडोचे नाव होते. त्याने आत्महत्या का केली ते मात्र समजू शकले नाही. गेल्या वर्षभरापासून कलिना कॅम्पसमधील फोर्स वन मुख्यालयात असलेल्या नंदलाल सोनावणे या कमांडोने आज सकाळी मुख्यालयाच्या गच्चीत जाऊन स्वत:कडील पिस्तुलातून आपल्या डाव्या बाजूच्या छातीत गोळी झाडली. गोळी आरपार गेल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नंदलाल याचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील साक्रीचा असलेला नंदलाल तीन वर्षांपूवी पोलीस दलात भरती झाला होता. तो फोर्स वनचे खडतर प्रशिक्षण घेत होता.
१२ मे रोजी लग्न होते
येत्या १२ मे रोजी नंदलाल सोनावणे याचे लग्न होणार होते. काही दिवसांवर लग्न येऊन ठेपलेले असताना नंदलाल याने आत्महत्या केली.
Post Top Ad
27 April 2013
Home
Unlabelled
फोर्स वन कमांडो सोनावणेची आत्महत्या
फोर्स वन कमांडो सोनावणेची आत्महत्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment