मुंबई - पालिकेच्या नायर, केईएम तसेच शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय या रुग्णालयांमध्ये असलेल्या उपचाराच्या अद्ययावत सोयी उपनगरीय रुग्णालयांपर्यंत पोचविण्यासाठी लिंकेज सिस्टीम कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी यांनी दिली.
ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे थायरॉईडचे प्रमाण वाढत आहे. थायरॉईड तसेच इएनटीसाठी अद्ययावत यंत्रणा फक्त पालिकेच्या तीन मोठ्या मुख्य रुग्णालयांमध्येच आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणे महिलांना शक्य होत नाही. ते त्रासाचे तसेच गैरसोयीचे आहे. त्यामुळे उपनगरीय रुग्णालयांमध्ये स्थानिक पातळीवर उपचार केले जावेत, यासाठी लिंकेज सिस्टीम पालिकेच्या आरोग्य खात्याने कार्यान्वित केली आहे. मुख्य रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टर उपनगरीय रुग्णालयांध्ये आठवड्याचे काही दिवस तपासणीसाठी येत असतात. प्रमुख रुग्णालयातील इएनटी डॉक्टर्सनी पंधरा दिवसातून एक दिवस उपनगरीय रुग्णालयात द्यावा अशी सूचना आरोग्य समिती अध्यक्षा गवळी यांनी आरोग्य खात्याला दिल्या आहेत. लिंकेज सिस्टीम अधिकाधिक व्यापक करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. रक्त तपासणी केंद्रेही ठिकठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment