मुंबई - शहराची साफसफाई करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचे धडे सफाई कामगारांना देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. प्रत्येक विभागात कामगाराच्या सोईनुसार हे आरोग्य शिक्षणाचे वर्ग घेतले जाणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना अनेक असाध्य आजार जडलेले असतात. त्यातच सतत घाणीत वावर असल्याने अनेक व्यसनांनाही त्यांना ग्रासलेले असते. त्यामुळे या सफाई कामगारांचे आयुष्यमानही कमी झालेले असते. अशा सफाई कामगारांना मिकी मेहता यांनी आरोग्याचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे प्रात्यक्षिक पालिका मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. या वेळी अधिकाऱ्यांना योगा; तसेच सकस आहाराचे महत्त्व सांगण्यात आले. हे सफाई कामगार मुंबईकरांसाठी काम करीत असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी खास वर्ग घेण्याचा विचार असल्याचे मेहता यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर प्रात्यक्षिक करण्यात आले असले, तरी सफाई कामगारांदेखील हे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. सफाई कामगारांकडून मागणी झाल्यास प्रत्येक विभागात असे प्रात्यक्षिक वर्ग घेता येतील, असे उपायुक्त प्रकाश पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment