मुंबई / अजेयकुमार जाधव
(http://jpnnews.webs.com)
जगभरातील आघाडीचे कार्डीयोलोजीस्ट , डायबेटीशियन्स, न्यूट्रीशनिस्ट आणि आरोग्यविषयक सल्लागार यांच्यामध्ये वंडर ऑंईल म्हणून ओळखल्या जात असलेल्या भाताच्या कोंड्याचे तेल जगातील सर्वात निरोगी तेल असून हे तेल कोलेस्ट्रोल व रक्तदाब कमी करते तसेच छोट्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी करते असे डॉ. नामवंत न्यूट्रीशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी सॉलव्हन्ट एक्स्ट्रकटर्स असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना भाताच्या कोंड्याच्या तेलामध्ये ओरीझेनॉल असल्याने शरीरातील एचडीएल किवा चांगले कोलेस्टेरॉल वाढते यामुळे लोकप्रिय ऑलिव ऑइल हे तेल अधिक निरोगी असते. भारतासारख्या देशात आपण पोषण मूल्यांबाबत सुरक्षेवर भर द्यायला हवा असे सांगून भाताच्या कोंड्याच्या तेलातील न्यूट्रासेंटीकल्समुळे चांगले आरोग्य राखत कोलेस्ट्रोलचे प्रमाण योग्य संतुलित राखण्यासाठी उपयोग होतो असे मुखर्जी यांनी सांगितले.
भाताच्या उत्पादनात भारत हा चीन नंतर दुसरा मोठा देश आहे. भारतात १४ लाख टन भाताच्या कोंड्याचे तेल बनवण्याची क्षमता आहे, परंतु केवळ ९ लाख टन तेल बनवले जाते. त्यापैकी केवळ ३ लाख टन तेल खाद्यतेलात वापरले जाते तर बाकीचे वनस्पती उद्योगात वापरले जाते किवा अन्य तेल बरोबर मिसळले जाते व ब्रांडेड उत्पादन म्हणून विकले जाते. रिटेल साखळ्यामध्ये लहान कंपन्यांचे अस्तित्व ठळक व्हावे म्हणून त्यांना पाठबळ देणे आणि खास तेलाच्या फायद्याबाबत ग्राहकांमध्ये जागृती करावी हा उद्देश असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. बी.व्ही. मेहता यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment