काटजूंविरोधात जनहित याचिका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 April 2013

काटजूंविरोधात जनहित याचिका

मुंबई : सातत्याने वादग्रस्त विधाने करून वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्टाचे नवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मार्कंडेय काटजू यांना संरक्षण देणारा प्रेस कौन्सिल कायदा सदोष असून तो रद्द करावा, अशी मागणी करणार्‍या देशभक्त पत्रकार मंचाचे मुंबई निमंत्रक आणि दै. 'सनातन प्रभात'चे पत्रकार अरविंद पानसरे यांच्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. काटजू हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून देशात संभ्रमाचे वातावरण करत आहेत. त्यांच्याकडील महत्त्वाचे पद लक्षात घेता त्यांचे वर्तन अयोग्य आहे. त्यामुळे न्या. काटजू यांना अध्यक्षपदावर राहाण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. प्रेस कौन्सिल कायद्यातील त्रुटींमुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची अथवा त्यांना पदावरून काढण्याची यंत्रणा अस्तित्वात नाही. प्रेस कौन्सिलचा कायदा सदोष असल्यामुळे तो रद्द करण्याची विनंती अर्जदारांतर्फे अँड़ संजीव पुनाळेकर यांनी याचिकेत केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad