ग्लोबल पंजाब अशोसिअनचा 'बैसाखी दि रात' चा कार्यक्रम संपन्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 April 2013

ग्लोबल पंजाब अशोसिअनचा 'बैसाखी दि रात' चा कार्यक्रम संपन्न

मुंबई / विठ्ठल कांबळे (http://jpnnews.webs,com)
पंजाबमध्ये बैसाखी च्या सणाला विशेष महत्त्व आहे.भारतात तसेच जगातल्या विविध शहरात पंजाबी लोक राहतात.सगळ्या पंजाबी लोकांना एकत्रित आणण्यासाठी ग्लोबल  पंजाब अशोसिअन तर्फे   नुकताच 'बैसाखी दि रात' चा कार्यक्रम अंधेरी येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आले होते.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात पंजाबी भाषेसाठी उल्लेखीनीय काम करणाऱ्या लोंकाना पदमश्री महेंद्र कपूर अवार्डने सन्मानित करण्यात आले.  

भारत जांच्या सिनेमामुळे ओळखू लागला अशा अभिनेता  व भूमिपुत्र मनोजकुमार यांना भारतीय चित्रपटासाठी विशेष योगदान म्हणून पदमश्री महेंद्र कपूर अवार्डने लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच पंजाबी भाषेतील सिनेमात आपले आहुष्य घालणाऱ्या प्रीती सप्रूस,सिनेमा आणि कुस्ती साठी दारासिंग, पंजाबी संगीतासाठी सुरेंदर कोहली यांना  पदमश्री महेंद्र कपूर अवार्डने सन्मानित करण्यात आले.पोलिस सेवेसाठी अ.सि. पी नवल बजाज, डीजीपी ओ पी बाली तर भारतीय न्यायिक सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या नायाधीक्ष जोगी सिंघ यांना पदमश्री महेंद्र कपूर अवार्डने सन्मानित करण्यात आले.
         
या कार्यकमात विविध कलाकारांनी आपली कला सादर केली. यावेळी ग्लोबल  पंजाब शोसिअन चे अध्यक्ष रमन खुराना यांनी सागितले कि,दरवर्षी आम्ही  कार्यक्रमाच्या माध्यमातून पंजाबी लोकांना एकत्र आण ण्याचे काम करतो.तसेच अशोसिअन तर्फे लोंकाच्या विविध समस्या दूर करण्याचे काम करते. लोकांना अन्नधान्य,कपडा पुरविन्याचे काम करते.       

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad