मुंबई : कोकणात फिरायला येणार्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे कोकणात मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोव्यासाठी चालवण्यात येणार्या गाड्यांना प्रचंड गर्दी असल्यामुळे कोकणात जाणार्या प्रवाशांना त्या गाड्यांचे तिकीट मिळत नाही; परंतु आता खास सावंतवाडीपर्यंतच गाडी चालवण्यात येणार असल्यामुळे कोकणात जाणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनातर्फे समर स्पेशल गाड्या चालवण्यात येतात. दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान ३८ जादा फेर्या चालवण्यात येणार आहेत. यापूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान ५८ फेर्या चालवण्यात येत आहेत. २१ एप्रिल ते २ जून दरम्यान 0१00३ दादर ते सावंतवाडी रोड ट्रेन दर मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी ७ वाजून ५0 मिनिटांनी चालवण्यात येणार असून, सावंतवाडीला रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी 0१00४ सावंतवाडी रोड-दादर दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी पहाटे ५ वाजता सुटणार असून दादरला दुपारी ४ वाजता पोहोचणार आहे. या ट्रेनला एक एसी टू-टायर कोच, ८ स्लीपर क्लास कोच, २ जनरल सेकंड क्लास कोच असणार आहेत. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्गनगरी आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. प्रवासी या ट्रेनचे आरक्षण १९ एप्रिलपासून करू शकतात
No comments:
Post a Comment