बेस्टविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 April 2013

बेस्टविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन


मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ९0 टक्के बसेस सीएनजीवर आहेत. कामगारांना बोनस, वेतनवाढ इत्यादी कारणासाठी आंदोलने करावी लागतात. असे असताना बेस्टची भाडेवाढ कशासाठी? असा सवाल करत मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. काही काळ रास्ता रोको केल्यामुळे या वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. मुं. यु अध्यक्ष गणेश कुमाप, इब्राहिम रॉय मनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बंद पडणार्‍या एसी बसेस कामगारांवर असणारा प्रचंड ताण, भटकटलेले वेळापत्रक, बस स्टॉपचा खेळखंडोबा या व इतर गैरसोयींबद्दल विचार करता फक्त दरवाढ करून प्रवाशांचे खिसे किती दिवस खाली करणार? बस डेपो विक्रीस काढून जमिनीतून करोडो रुपये कमावणार्‍या बेस्टने बेस्ट बंद पाडण्याची चाल सुरू केली आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा देत गणेश कुमार यांनी यापुढचे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad