चर्मोद्योग कामगार सेनेला समाजकल्याण मंत्र्यांचे आश्‍वासन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 April 2013

चर्मोद्योग कामगार सेनेला समाजकल्याण मंत्र्यांचे आश्‍वासन

मुंबई : गटई कामगारांना पीच लायसन्स, स्टॉल, वीज पुरवठा, थकीत भाडे भरण्यासाठी पुरेसा अवधी, सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये संत रविदास महाराज यांची प्रतिमा लावण्याचे आदेश देण्यात यावेत, अशा अनेक मागण्या मान्य करून घेण्यासाठी शिवसेना प्रणीत चर्मोद्योग कामगार सेनेच्या वतीने आझाद मैदान येथे महामोर्चाचे आयोजन अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. 

चर्मोद्योग कामगारांच्या विविध समस्यांच्या पूर्ततेसाठी आणि अनेक प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चाला चर्मोद्योग कामगार सेनेच्या महाराष्ट्रातील सर्वच महिला-पुरुष पदाधिकार्‍यांसह हजारो गटई कामगार उपस्थित होते. या वेळी अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांची भेट घेतली. मंत्र्यांनी सर्वच मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad