ठाण्यामध्ये बुद्ध विहाराच्या जागेवरून कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2013

ठाण्यामध्ये बुद्ध विहाराच्या जागेवरून कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

प्रकरण मिटवण्यासाठी आंबेडकरी नेत्यांवर दबाव
ठाण्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती
मुंबई / अजेयकुमार जाधव
ठाणे जिल्ह्यातील वागळे एस्टेट परिसरातील आंबेवाडी बुद्ध विहाराची जागा हडप करण्यासाठी अंबादास सोनावणे या आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यावर शनिवाच्या रात्री १२ च्या सुमारास माजी नगरसेवक एकनाथ भोईर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. याबाबत वागळे इस्टेट पोलिस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व जीवघेण्या हल्ल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार वागळे इस्टेट परिसरात आंबेवाडी बुद्ध विहाराची जागा आहे हि जागा काही लोक हडप करण्याचा प्रयत्न सातत्याने करत होते. हि जागा येथील बौध्द समाजाचे लोक सोडण्यास तयार नव्हते. यामुळे येथील स्थानिक लोकांना सातत्याने धमकावले जात होते. १७ एप्रिल रोजी या जागेची साफ सफाई करावयास गेलेल्या बौद्ध समाजाच्या लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. बुद्ध विहाराची जागा हडप करण्यासाठी दगडफेक झाल्याने वागळे इस्टेट पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करण्यात आली होती. 

दगडफेकीची घटना घडल्यावर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केल्यावर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी अपेक्षा असतानाच काळ शनिवारी रात्री १२ च्या सुमारास अंबादास सोनावणे या कार्यकर्त्यावर वार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी असलेल्या अंबादास सोनावणे याच्यावर पोखरण रोड २ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळते. 

याबाबत बौध्द धर्मीय व बहुजन चळवळीतील सर्व पक्षीय नेत्यांनी रविवारी बैठक घेवून या प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवला असून अंबादास सोनावणे यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या माजी नगरसेवक एकनाथ भोईर व त्यांच्या कार्यकर्त्यांना त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणी केली असल्याचे तसेच काही कारवाही झाली नसल्यास रात्री उशिरा आंबेडकरी समाजातील सर्व पक्षीय नेते आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे विजय घाटे, भास्कर वाघमारे यांनी सांगितले आहे. 

प्रकरण मिटवण्यासाठी आंबेडकरी नेत्यांवर दबाव
ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय नेत्यांना एका ठाणे जिल्यातील जातीवादी पक्षाच्या प्रमुखाकडून व सोनावणे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांकडून तसेच पोलिसांकडून हे प्रकरण मिटवण्यासाठी सांगितले जातअसल्याने ठाणे परिसरातील आंबेडकरी जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad