अनधिकृत बांधकामप्रकरणी राजकीय नेत्यांना नोटिसा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2013

अनधिकृत बांधकामप्रकरणी राजकीय नेत्यांना नोटिसा

अजित पवार, गोपीनाथ मुंडेंचा समावेशमुंबई : वरळी येथील सुखदा आणि शुभदा या इमारतीत राहणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, पतंगराव कदम, भाजपा नेते गोपीनाथ मुंडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदी नेत्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारत विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी संबंधित नोटिसा पाठविण्यात आल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

शीळफाटा येथील दुर्घटनेनंतर सर्वच महापालिकांनी अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. याच मोहिमेंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारत विभागाने काही प्रमुख राजकीय नेत्यांना नोटिसा धाडल्या आहेत. वरळी येथील सुखदा आणि शुभदा या इमारतींत 'चेंज ऑफ युर्जस' न करता कार्यालयांचे बांधकाम करण्यात आल्याचे उघड झाले आहे. माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) माध्यमातून ही माहिती उघडकीस आणल्यानंतर पालिकेने कारवाईचे पाऊल उचलले आहे. पालिकेच्या इमारत विभागाने एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटीस बजावली आहे.संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार जबाबदार नागरिकांविरोधात अटकेची कारवाई होऊ शकते. इमारत विभागाने ५ जून, २00४ रोजी एक आराखडा मंजूर केला होता. त्यात छोटी-छोटी दुकाने दाखवण्यात आली होती. नंतर त्यात बदल करून अनधिकृतपणे मोठमोठी कार्यालये उभारली गेली. संबंधित अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पतंगराव कदम, गोपीनाथ मुंडे, माणिकराव ठाकरे, प्रतापसिंह मोहिते-पाटील, अनिल देशमुख, रणजीत देशमुख, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील आदींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad