http://jpnnews.webs.com
मुंबई, - म्हाडाच्या घरासाठी पत्रकार कोट्यातून अर्ज करणार्यांना आता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय म्हाडाच्या विभागप्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे. त्याचबरोबर म्हाडामध्ये १२ वर्षे काम करणार्या कर्मचार्यालाच आता म्हाडा कर्मचारी कोट्यातून अर्ज करता येईल असाही निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
म्हाडाच्या सोडतीत अनेक त्रुटी असून या त्रुटी दूर करीत सोडतीत सुधारणा करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. त्यानुसार म्हाडाने विविध कोट्यांतील अर्जदारांची पात्रता निश्चिती सोपी आणि योग्य प्रकारे व्हावी यादृष्टीने काही सुधारणा केल्या आहेत. त्याअनुषंगाने यापुढे कलाकारांनाही सांस्कृतिक संचालनालयाकडून प्रमाणपत्र आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबरोबरच अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या घरासाठी अर्ज करणार्या आणि त्यात विजयी ठरणार्या अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्र निश्चित वेळेत अर्थात देकार पत्र मिळण्याआधी म्हाडाकडे सादर करावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment