जुन्या रिक्षा-टॅक्सींना परिवहन विभागाचा दणका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 April 2013

जुन्या रिक्षा-टॅक्सींना परिवहन विभागाचा दणका


मुंबई : राज्यातील रिक्षा-टॅक्सीच्या प्रवाशांना भाडेवाढीनंतर दिलासा देण्यासाठी परिवहन विभागाने २0 वर्षांपेक्षा जुन्या टॅक्सी आणि १६ वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा मोडीत काढण्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे. त्यामुळे खिळखिळय़ा झालेल्या रिक्षा-टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरून गायब होणार आहेत. याची अंमलबजावणी येत्या १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

राज्यातील रिक्षा-टॅक्सीचे भाडे दरवर्षी १ मे रोजी सुधारित करण्याची हकीम यांच्या अहवालातील शिफारस मान्य करीत असतानाच प्रवाशांच्या सोयीसाठी रिक्षा-टॅक्सीचालकांना काही नियम लावण्याचे परिवहन विभागाने ठरविले होते. त्यानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाअंतर्गत येणार्‍या सर्व रिक्षा-टॅक्सींसाठी कडक धोरण अवलंबण्यात येणार आहे. सोमवारी राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली त्यामध्ये मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाअंतर्गत येणार्‍या

२0 वर्षांपेक्षा जुन्या टॅक्सी आणि १६ वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर आढळल्यास त्यांना फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येणार नसल्याची महिती परिवहन आयुक्त व्ही.एन.मोरे यांनी दिली. १ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्या रिक्षा-टॅक्सीचालक-मालकांची रिक्षा-टॅक्सी २0 आणि १६ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत, त्यांना नवीन रिक्षा-टॅक्सी घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असल्याची माहिती मोरे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad