मुंबई : उजनी धरणातील पाणी मिळावे या मागणीसाठी गेल्या ७४ दिवसांपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार्या प्रभाकर ऊर्फ भय्या देशमुख यांनी बुधवारी अखेर ५00 ते १000 सर्मथकांसह थेट विधिमंडळावर धडक मोर्चा नेला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान साधून लगेचच भय्या देशमुखांना ताब्यात घेतले आणि पुन्हा आझाद मैदानाचा रस्ता दाखवला. त्यानंतर देशमुखांना आणि त्यांच्या सर्मथकांना
पोलिसांक डून आझाद मैदानात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ एका शेतकरी सर्मथकाने झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रय▪केला. त्याला खाली उतरवण्यात पोलिसांना वारंवार अपयश येत होते. अखेरीस त्याने झाडावरून उडी घेतल्याने बेशुद्ध झालेल्या या शेतकर्याला पोलिसांनी जी.टी. रुग्णालयात दाखल केले.
देशमुखांच्या सर्मथनार्थ आलेल्या शेतकर्यांमध्ये महिलांचाही मोठय़ा प्रमाणावर सहभाग होता. उजनी धरणातील पाणी मिळावे या मागणीसाठी प्रभाकर ऊर्फ भय्या देशमुख हे गेल्या ७४ दिवसांपासून आझाद मैदानात धरणे आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान, त्यांच्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्षच केल्याने अखेरीस देशमुख यांनी आपल्या सर्मथकांसह थेट विधिमंडळावर धडक मोर्चा नेला. मात्र विधान भवनासमोर पोलिसांनी देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुन्हा आझाद मैदानात सोडण्यात आले. तसेच त्यांना आझाद मैदानाबाहेर न पडण्याची सक्त ताकीद देण्यात आली. अशाप्रकारे देशमुख यांना पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले. या कारवाईचा निषेध म्हणून धनाजी आवळे नामक आंदोलक शेतकर्याने आझाद मैदानातील झाडावर चढून घोषणाबाजी केली आणि आंदोलन केले. धनाजीला झाडावरून खाली उतरवण्याचा पोलिसांनी वारंवार प्रय▪केला; परंतु त्यांना अपयश येत होते. अखेरीस धनाजीने झाडावरून उडी घेतल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला पोलिसांनी बेशुद्धावस्थेतच जी.टी. रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
No comments:
Post a Comment