न्यायालयाचा अवमान // मागासवर्गीय आयोगाच्या अधिकारावर गदा
मुंबई / अजेयकुमार जाधव
राज्य व केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्याशिवाय कोणालाही आरक्षण देत येत नाही असे न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले असतानाही न्यायालयाचा अवमान करून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नारायण राणेंची नियुक्त केलेली समिती हि म्यानेज व बेकायदेशीर असल्याचा आरोप ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे संजय कोकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
नारायण राणे यांच्या समितीमुळे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अधिकारावर गदा आली आहे. बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकरले होते. बापट आयोगाचा अहवाल पुनर्विचारासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्यात आला असताना त्यावर आयोग काही निर्णय घेण्या आधीच सरकारने मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्यासाठी उच्चस्थरीय समिती स्थापन केल्याने मागासवर्गीय आयोगाच्या अधिकारावर गदा आणण्याचे तसेच न्यायालयाच्या अवमान केल्याचे कोकरे यांनी सांगितले.
सविधानानुसार मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात घेतले जाऊ शकत नाही. यामुळे बापट आयोगाने केलेल्या शिफारशी सराफ आयोगाकडून राज्य सरकारने मागितलेली माहिती आदींचा आढावा घेवून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची शिफारस करण्याचे अधिकार नारायण राणे यांच्या समितीला दिले असल्याने राणे यांची समिती म्यानेज केलेली समिती असल्याचा तसेच मराठ्यांची सत्ता असतानाही मराठ्यांचा विकास होऊ शकत नसेल तर हे सत्ताधारी महाराष्ट्राचा विकास कसा करू शकतात आरोप कोकरे यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब लोकांना न्याय मिळावा यासाठी भारतीय संविधानात कलम ३८, ३९, ४६ नुसार विशेष आर्थिक प्याकेज देण्याची तरतूद करून ठेवली आहे. या तरतुदीनुसार आर्थिक प्याकेज मागितल्यास बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मोठे होईल म्हणूनच मराठा समाजाला आरक्षण देवून ओबीसी मध्ये समावेश करावा अशी मागणी करून ओबीसी समाजाला गुलामगिरीत ठेवण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप कोकरे यांनी केला आहे.
दरम्यान येत्या १२ एप्रिलला नारायण राणे यांच्या समिती पुढे ओबीसी समाजाची भूमिका मांडण्यासाठी बोलावण्यात आले असून मराठा आरक्षणा विरोधात ओबीसी समाजाची भूमिका मांडणार असल्याचे कोकरे यांनी सांगितले. न्यायालयाचा अवमान करून मागासवर्गीय आयोगाच्या अधिकारावर गदा आणून मराठा समाजाचे ओबीसी कारण करण्याचा प्रकार सरकारने केल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू असा इशारा कोकरे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment