हॉटेल व्यावसायिकांचा २९ एप्रिलला देशव्यापी बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 April 2013

हॉटेल व्यावसायिकांचा २९ एप्रिलला देशव्यापी बंद

मुंबई / http://jpnnews.webs.com
मुंबई : केंद्र सरकारने हॉटेल व्यवसायावर लादलेल्या विविध करांच्या बोझ्यामुळे ग्राहकांना हॉटेलमधील खाद्यपदार्थांसाठी ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. त्या करवाढीचा हॉटेल व्यवसायावरही विपरीत परिणाम झाला आहे. सरकारने त्या विविध करांचा भार कमी करावा, या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या २९ एप्रिल रोजी संपूर्ण देशभरातील हॉटेल्स, बार आणि रेस्तरॉ बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल व्यावसायिकांनी घेतला आहे. त्यामुळे हॉटेल उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच लाखो हॉटेल्स बंद राहणार आहेत.

सर्व राज्ये तसेच प्रमुख महानगरांतील हॉटेल्स व्यावसायिकांच्या संघटनांची नुकतीच मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीत करवाढीविरोधात २९ एप्रिल रोजी लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अखिल भारतीय हॉटेल व्यावसायिक संघटनेतील एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले. सद्यस्थितीत ग्राहकांना हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. १२.५ टक्के व्हॅट तसेच अन्य करांच्या बोझ्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. सरकारने केवळ बिलाच्या ६0 टक्के रकमेवर व्हॅट आकारणी करावी, ही हॉटेल व्यावसायिकांची प्रमुख मागणी आहे. यापूर्वी सेवाकर हा पाटर्य़ा, लग्न समारंभ आणि मद्य पुरवणार्‍या वातानुकूलित रेस्तरॉंसाठी लागू केला जात होता. परंतु मागील अर्थसंकल्पात हा सेवाकर सर्व प्रकारच्या रेस्तरॉसाठी लागू करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad