मुंबई- बहुसंख्येच्या, जातीच्या आधारावर मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचे सूत्र काही मोजक्या घराण्यांनी विकसित केले आहे. त्यांची मक्तेदारी मोडायची असेल, तर छोटे मतदारसंघ निर्माण करायला हवेत. त्यासाठी छोटी राज्ये अस्तित्वात आणावी लागतील. म्हणून मी वेगळ्या विदर्भाच्या पाठीशी आहे, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्रातील नेते जसे आक्रमक राजकारण करतात, तसे राजकारण विदर्भाला जमले नाही. विदर्भातील नेतृत्वाची मानसिकता कायम गुलामीची राहिली. विदर्भाच्या नेतृत्वाने मिळेल त्यावरच समाधान मानले. त्यामुळे विदर्भाचा शेतकरी लढायचे सोडून आत्महत्या करत आहे, असे आंबेडकर म्हणाले.
सहकार आणि कामगार चळवळ आज बंद पडली आहे. त्यामुळे कार्यकर्ते निर्माण होणे बंद झाले. म्हणूनच राजकारणातील मोजक्या घराण्याचे फावते. राजकारणातील ‘काकां’ची पुण्याई संपवण्यासाठी आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी छोटे मतदारसंघ, पर्यायाने छोटी राज्ये हवीत, असा मुद्दा प्रकाश आंबेडकर यांनी आग्रहाने मांडला.
No comments:
Post a Comment