मुंबई / रशीद इनामदार
कालच्या तुलनेत सोने आज १७०० रु कमी भावाने कमोडीटी बाजारात विकलं जात आहे . त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक दार चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे . सायप्रस देशाने आपल्याकडील मोठ्या प्रमाणात असलेला सोन्याचा साठा ४०० दश लक्ष युरो किमतीत विकणार असल्याचे जाहीर केले आहे . त्यामुळे बाजारात सोन्याची आवक वाढून सोन्याची किंमत कमी होईल . या भीतीने कमोडीटी मधील गुंतवणूकदारांनी आपल्याकडील सोने विकण्यास सुरु केले आहे . सोन्याचा भाव त्यामुळे कोसळू लागला आहे.
जाणकारांच्या मते जर अशीच विक्री सुरु राहिली तर सोन्याचा भाव २३,४०० च्या आसपास येउन स्थिर होण्याची शक्यता आहे . आज बाजारात सोने विकण्यासाठी खूप गुंतवणूकदार होते पण विकत घेऊन नुकसान सहन करावे लागेल या भीतीने खरेदीदार नव्हते .त्यामुळे नियमानुसार सोन्याचा बाजार ३ दा काही काळासाठी गोठवण्यात आला होता .
Post Top Ad
16 April 2013
Share This
About Anonymous
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
Newer Article
मुरलीधर शिंगोटे यांना महात्मा फुले पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार
Older Article
दगड मातीच्या स्मारकापेक्षा विचारांचा प्रसार करणे गरजेचे - मुख्यमंत्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment